Thursday 19 March 2015

पाऊस तुझ्या स्मरणांचा...

पाऊस तुझ्या स्मरणांचा
विरहात असा रिमझिमतो
मन चिंब भिजत जाताना
तव गंधातून घमघमतो...

ओलेत्या धुंद क्षणांची
सर आठवणींची ओली
ओंजळीत मी धरलेला
पाऊस तुझा मखमाली...

चाहूल रेशमी होते
भासांमधुनी थिजलेली
त्या ओळखीच्या वळणावर
हळव्या-स्पर्शी भिजलेली...

भिजल्या स्वप्नांची हिरवळ
मग पसरत जाते मनभर
डोळ्यांच्या काठी थांबून
सय ओली वाहे झरझर...

थेंबोथेंबी मग दिसतो
मज हसणारा तो चेहरा
थोडासा सावळ, निळसर
अन् थोडा रंगबिलोरा...


-पूजा भडांगे 

No comments:

Post a Comment