Saturday 5 September 2015

विसरलेला शिक्षक दिन

शाळा सोडून दोन वर्ष झाल्यानंतर त्या सगळ्या वातावरणापासून दूर जाऊन आपण जेव्हा एका वेगळ्याच क्षेत्रात रमलेलो असतो. तेव्हाच अचानक आजच्या दिवशी एखाद्या चिमुकल्याचा फोन येतो अन् तो म्हणते की,
" Happy teachers Day पूजा टीचर smile emoticon
मी दर्शन.. पाचवी "अ" मधला. आता सातवीतेय.. तिसरीच्या टिचरांकडून तुमचा फोन नंबर घेतला आणि त्यांच्या फोनवरुनच फोन केला.
तुमची खूप आठवण आज पहिल्या तासाला. तुम्ही शिकवलेली ती प्रार्थना आम्ही आजही म्हणतो आणि ते रोज दैनंदिनीचं गणित तेही चालू आहे त्यामुळे माझं अक्षर खूप सुधारलंय टिचर.. आज स्पर्धा आहेत दुपारी हस्ताक्षरच्या.. मी भाग घेतलाय पहिल्यांदाच..
चला ठेवतो टिचर. बेल होईल. नविन सर आलेत त्यांचा तासेय.. "
मी 'घाई न करता नीट लिही' असं सांगण्याआतचं पलिकडून फोन कट... !
दोन वर्षात जाणूनबुजून विसरायचा प्रयत्न केलेला शिक्षक दिन आणि माझ्यातल्या किंचितश्या शिक्षिकेची आठवण करून देण्यासाठी खूप सारे थ्यँक्यू बेटा..

1 comment: