Monday 21 September 2015

ओळ . . .

एक एक ओळ
येते पानावर 
जशी पोर नख-यात 
चाले भराभर. . . 

शब्दांच्यामधून 
अर्थ ती लावत 
गाली हात लाउनिया 
बसे विचारात. . . 

सुचता काहीसे 
लेखणी ती घेते 
मनाआतले ती मन 
लिहून काढते . . . 

कधी गीत होते 
कथाही सांगते 
ललितामधुन जग 
नवेसे मांडते. . . 

तिच्या कवितेला  
प्रतिभेचा मोह 
कधी गूढ जाणिवांचा 
अर्थगम्य डोह. . . 

अशी पोर ओळ 
जाणती होताना 
देखणी लेखणी वाटे 
शाई झरताना. . . 

ओळ अशी मला 
वाटते सुचावी 
पानावरून ती थेट 
काळजा भिडावी. . . 

पूजा भडांगे बेळगाव 



 

5 comments:

  1. छान कविता पूजा

    ReplyDelete
  2. छान कविता पूजा

    ReplyDelete
  3. खूपच छान आणि त्याला पावसाच्या धारा येती भराभरा ची लावलेली चालही सुंदर

    ReplyDelete
  4. खूपच छान आणि त्याला पावसाच्या धारा येती भराभरा ची लावलेली चालही सुंदर

    ReplyDelete
  5. Autobiography of creativity... Great ...punam kataria

    ReplyDelete