Friday 4 September 2015

गझल

नकोसे वाटले ते का घडाया लागले. . . ?
तुझ्या माझ्यातले अंतर मिटाया लागले. . .
मनाला सक्त ताकिद मी दिली होती तरी
तुझ्या दारात का ते बागडाया लागले... ?
तुझा चौकोन माझ्या भोवती आखून मी
तुझ्या गुंत्यात कोडे सोडवाया लागले...
कळेना काय होते नेमके माझे मला
म्हणे तो. . "पण मला सारे कळाया लागले…"
स्वतःसाठी कधीही वेळ मी नाही दिला
अता इतकी मला मी आवडाया लागले...
खरेतर लाजण्याचा प्रांत हा माझा नसे
तरीही गाल का आरक्त व्हाया लागले...?
लिहाव्या वाटल्या खाणाखुणा, शपथा तुझ्या
म्हणूनच शेर हे आता सुचाया लागले...

पूजा भडांगे बेळगाव 


1 comment:

  1. कळेना काय होते नेमके माझे मला
    म्हणे तो. .
    "पण मला सारे कळाया लागले…"
    स्वतःसाठी कधीही वेळ मी नाही दिला
    अता इतकी मला मी आवडाया लागले...
    खरेतर लाजण्याचा प्रांत हा माझा नसे
    तरीही गाल का आरक्त व्हाया लागले...?
    लिहाव्या वाटल्या खाणाखुणा,
    शपथा तुझ्या
    म्हणूनच शेर हे आता सुचाया लागले...
    Class

    ReplyDelete