Friday 4 September 2015

भाऊ. . . !


पाठीमागे पाठ लाऊन येत असतात भाऊ...
घोडा होऊन पाठीवरती घेत असतात भाऊ...
वेणी ओढतात, खोड्या काढतात..
कारणाशिवाय गाल ओढतात..
पाठीवरती गुद्दा देतात...
आणि लाडातसुद्धा येतात...
भांडले तरी आपले पाठीराखे असतात भाऊ...
घोडा होऊन पाठीवरती घेत असतात भाऊ...
खेळामध्यॆ साथ देतात...
हातामध्ये हात देतात...
चुकल्यावरती मार देतात...
डोळ्यांमधला धाक देतात..
द्वाड असले तरी खूप प्रेमळ असतात भाऊ...
घोडा होऊन पाठीवरती घेत असतात भाऊ...
खूप खूप लाड करतात...
आपल्या पंखाखाली धरतात...
आई, बाबा यांच्याआधी,
सगळं काही समजून घेतात...
रागीट असले तरी खूप काळजी करतात भाऊ...
घोडा होऊन पाठीवरती घेत असतात भाऊ...
कायम बहिणीसोबत असतात...
तिचे पहिले मित्र असतात...
तिच्या नुसत्या हास्यावरही...
आला राग विसरून जातात...
दाखवत नसले तरी खूप हळवे असतात भाऊ...
घोडा होऊन पाठीवरती घेत असतात भाऊ...
आईसारखी माया करतात...
बाबासारखी काळजी करतात...
झोप येत नसते तेंव्हा,
थोपटताना गाणे गातात...
बहिणीसाठी तिचे खरे हिरो असतात भाऊ...
घोडा बनून पाठीवरती फिरवत असतात भाऊ...

No comments:

Post a Comment