Thursday 19 March 2015

चांदणराती...


अंधाराने पाय ठेवले
क्षितिजाच्या उंबरठ्यावरती
स्वागतास तव उभ्या तारका 
पौर्णिमेतल्या चांदणराती....

वयात आलेल्या चंद्राने,
निळ्या नदी प्रतिबिंब सांडले,
उठले तेंव्हा तरंग अलगद
प्रणयालाही आली भरती....

अंगणातल्या जाई-जुईंनी
माझ्या दारी सडा घातला,
शुभ्र-फुलांना चुंबीत, हर्षीत
गंधीत झाली सारी धरती....

आठवते का सख्या तुला ती
भेट आपुली वळणावरची,
जरा कुठे मी तुला स्पर्षता
मध्येच रिमझिमल्या बरसाती....

दूर तिथे तू दूर इथे मी
तरी वाटे शल्य मला रे
क्षणाक्षणाला तुझ्याच सखया
ठेवणीतल्या भेटी स्मरती....

कु. पूजा भडांगे

No comments:

Post a Comment