Friday 4 September 2015

ऐकते किनारी संध्या. . .


ऐकते किनारी संध्या
मारव्यात भिजली गाज
पाण्याच्या देह उसळता
लाटेत लपवितो लाज...
लाजेची सुंदर नक्षी
वाळूवर कोरित जाते
ती तरंग हलके हलके
स्पर्शून नितळशी होते...
स्पर्शातून विरघळणारे
स्पर्शांचे दंश शहारे
क्षितिजादेखील कळती
पाण्याचे ओल इशारे...
पाण्यावर शांत निजावी
ही सांज सावळी भोळी
निळरंग लेऊनी व्हावी
शीतल अन लेकुरवाळी...
लेकुरवाळ्या वेळेला
गोंजारत बसती सारे
त्याक्षणी हासुनी गाती
डोळ्यात नभाच्या तारे. . .

No comments:

Post a Comment