Tuesday 17 March 2015

बयो


         एखादा दगड आला पाहिजे बयो आता , आपल्या दिशेनेही. . आपणच आपल्यासाठी सोडलेला . .! 

     आरशावर बेचकीचा अचूक नेम धरून स्वतःच्याच अस्तित्वावर प्रत्यंचा लावण्याची सोय या जगात झाली तर किती बरं होईल ना. .?
केवळ एका घावावर सगळं कसं सुटसुटीत. . शरीराचा, मनाचा एकेक कोपरा तडा गेलेल्या आरशा बरोबर आनंदाने स्वतंत्र झाला असता आणि समोरच्या प्रतीबिंबात दिसणारं आपलं बाह्यरूप फुटलेल्या काचेबरोबर धारधार झालं असतं. . ज्याला कुठलाही ति-हाईत हातात उचलून घ्यायची हिमंत तर दूर तसा विचारही करणार नाही. 

महत्त्वाचं म्हणजे नको तेंव्हा हळव्या होणा-या या बेरक्या मनाला क्षणार्धात फोडून काढल्याचं समाधान तर असतंच पण, त्याहूनही आपल्याच डोळ्यात वर्षानुवर्षे मरून पडलेल्या हजारो स्वप्नांना एकाचवेळी श्रध्दांजली वाहून आपलाही बराच वेळ वाचवता आला असता.

"आता असा 'दगड' आणि अशी 'बेचकी' मिळेपर्यंत आपण आरशापुढे उभ्या राहूयात..
अश्याच...
ढिम्म नजरेने . .

जश्या काल होतो . . . !!

पूजा भडांगे बेळगाव

No comments:

Post a Comment